महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आयुष्मान खुरानाचा 'बाला' चित्रपट चित्रीकरणापूर्वीच अडचणीत; कथा चोरीचा आरोप

काहीदिवसांपूर्वीच आयुष्मान खुरानाने त्याच्या आगामी 'बाला' चित्रपटाबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. मात्र, चित्रीकरणापूर्वीच हा चित्रपट वादात अडकला आहे.

आयुष्मान खुरानाचा 'बाला' चित्रपट चित्रीकरणापूर्वीच अडचणीत; कथा चोरीचा आरोप

By

Published : Jun 3, 2019, 10:02 AM IST

मुंबई - अभिनेता आयुष्मान खुराना त्याच्या प्रत्येक चित्रपटातून काहीतरी वेगळी भूमिका साकारत असतो. त्याने काहीदिवसांपूर्वीच त्याच्या आगामी 'बाला' चित्रपटाबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. मात्र, चित्रीकरणापूर्वीच हा चित्रपट वादात अडकला आहे. या चित्रपटावर कथा चोरीचा आरोप झाला आहे. याविरोधात कमलकांत चंद्रा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आली.

मार्च महिन्यामध्ये कमलकांत चंद्रा यांनी मुंबई उच्च न्यायालयात आयुष्मान खुराना, दिग्दर्शक अमर कौशिक आणि चित्रपट निर्माते दिनेश विजान यांच्या विरोधात चित्रपटाची कथा चोरी केल्याचा आरोप लावत तक्रार दाखल केली होती. आता पुन्हा एकदा कमलकांत यांनी न्यायालयाच्या निर्णयाआधी चित्रपटाचे शूटिंग सुरू केल्याबाबत आयुष्मान आणि चित्रपट निर्मात्यांवर कलम ४२० (फसवणूक) आणि कलम ४०६ (विश्वासघात) अंतर्गत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

आयुष्मानने ६ मे रोजी चित्रपटाचे शूटिंग सुरु झाल्याचे ट्विट केले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाआधी शूटिंग सुरू करणे चुकीचे आहे. मग, त्यांनी १५ दिवसातच शूटिंगला कशी सुरुवात केली?, असे चंद्रकांत यांनी म्हटले आहे. याप्रकरणी आयुष्मान आणि त्याच्या टीमने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 'आमची स्क्रिप्ट मूळ, खरी आहे आणि आम्ही ती न्यायालयात सादर करु' असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे 'बाला' चित्रपटाचे भविष्य काय असेल, हे न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबुन आहे. तोपर्यंत प्रेक्षकांना या चित्रपटाची वाट पाहावी लागेल.

आयुष्मानच्या 'आर्टिकल-१५' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातही आयुष्मान एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details