मुंबई- शुभो बासु नाग हे अवांछित या मराठी सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. या सिनेमाचं चित्रीकरण ते आपल्या आवडत्या शहरात करत आहेत. कोलकातामध्ये चित्रपटाचं शूटींग केलं जात असून याठिकाणी चित्रीत होणारा हा पहिलाच मराठी सिनेमा असणार आहे.
अवांछित: कोलकात्यात चित्रीत होणारा पहिला मराठी सिनेमा - योगेश सुमन
शुभो बासु नाग हे अवांछित या मराठी सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. कोलकातामध्ये चित्रपटाचं शूटींग केलं जात असून याठिकाणी चित्रीत होणारा हा पहिलाच मराठी सिनेमा असणार आहे. प्रीतम चौधरी या सिनेमाची निर्मिती करत आहेत.
या सिनेमासाठी शुभो यांनी मराठी चित्रपसृष्टीतील काही उत्तम कलाकारांची निवड केली आहे. यात डॉ. मोहन अगाशे, किशोर कदम, अभय महाजन, मृण्मयी गोडबोले, योगेश सुमन, मृणाल कुलकर्णी, सुहास जोशी आणि बंगाली कलाकार बरुण चंदा यांचा समावेश आहे.
अवांछित हा सिनेमा कोलकात्यात घडणाऱ्या एका वडिल आणि मुलाच्या नात्यावर आधारित असणार आहे. या सिनेमाची कथा, स्क्रीनप्ले आणि डायलॉग योगेश जोशी यांनी लिहिले आहेत. तर यातील गाण्यांना ओमकार कुलकर्णीचे बोल आहे. प्रीतम चौधरी या सिनेमाची निर्मिती करत आहेत.