महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मोदींच्या ’मा की रसोई’त घुमणार आशा भोसलेंचा आवाज

नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गुजरातमध्ये तयार होत असलेल्या न्यूट्रिशन पार्कमध्ये आशा भोसले यांचा आवाज घुमणार आहे. या पार्कमधील असलेल्या 'मा की रसोई ’ साठी मराठी चित्रपट निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी हिंदी गीत लिहिले असून प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत प्रसिद्ध गायिका आशाताई भोसले यांनी गायिले आहे.

Maa Ki Rasoi

By

Published : Jul 20, 2019, 2:03 PM IST


मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील पहिले न्युट्रिशन पार्क गुजरात राज्यातील केवाडिया येथे तयार होत आहे. या पार्कमध्ये मुलांसाठी म्हणून खास विविध स्थानके असतील. या प्रत्येक स्थानकावर मुलांची छोटी रेल्वे थांबून तिथे असलेले खेळ,दूध नगरी, फलाहार, विज्ञान,अशा विविध विभागांत त्या-त्या संदर्भात मनोरंजनातून मुलांना माहिती दिली जाईल.

’मा की रसोई’त घुमणार आशा भोसलेंचा आवाज

या सर्व विभागांसाठी क्रिएटीव्ह दिग्दर्शक म्हणून आणि यातील एक महत्त्वाचा विभाग असलेल्या 'मा की रसोई ’ साठी मराठी चित्रपट निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी हिंदी गीत लिहिले असून प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत प्रसिद्ध गायिका आशाताई भोसले यांनी गायिले आहे. महेश टिळेकर यांची संकल्पना, दिग्दर्शन असलेल्या या गाण्यात ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान आज्जीच्या भूमिकेत आपल्याला पहायला मिळतील.

"पान खायो सय्या हमार" हे प्रसिद्ध गाणे आशाताईंनी वहिदा रेहमान यांच्यासाठी गायले होते. यावेळी पुन्हा एकदा ८६ वर्षांच्या आशाताई, ८२ वर्षांच्या वहिदा रेहमान यांच्यासाठी महेश टिळेकर यांनी लिहिलेल्या "मा की रसोई " या गीतासाठी तब्बल ५० वर्षांनंतर गाणार आहेत.

बर्ड फ्लू, चिकुन गुनियासाठी महेश टिळेकर यांनी काही वर्षांपूर्वी तयार केलेली गाणी खूप लोकप्रिय होऊन त्याची लिम्का बुक नॅशनल रेकॉर्डमध्ये नोंदली गेली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details