जम्मू आणि काश्मिरमध्ये राजकीय पक्षांचे अनेक नेते नजरकैदेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला. त्यांची सुटका लवकर व्हावी यासाठी त्यांच्या पाठीशी पूजा बेदी ठाम राहिली आहे.
पूजाने एक ट्विट करुन ओमर अब्दुल्ला यांना सोडण्यासाठी सरकारला विनंती केली आहे. हे ट्विट तिने पंतप्रधान कार्यालय आणि अमित शाह यांना टॅग केले आहे. पूजा बेदी आणि ओमर अब्दुल्ला वर्गमित्र होते. त्यांचे कुटुंबिय एकमेकांना ३ पिढ्यांपासून ओळखतात. अशावेळी संकटात सापडलेल्या मित्राच्या पाठीशी ठाम राहण्याचे कर्तव्य पूजाने पार पाडलंय.
पूजा बेदी यंनी ट्विटमध्ये लिहिलंय, ''महिनाभर झाले ओमर अब्दुल्ला यांनी बंदी बनवण्यात आलंय. ते माझे वर्गमित्र आहेत आणि मागील ३ पिढ्यांपासून ते आमचे फॅमिली फ्रेंडही आहेत. त्यांच्या सुटकेसाठी सरकार लवकरच उपाययोजना करेल अशी मला आशा आहे. त्यांना कायमचे बंदीवासात ठेवले जाऊ शकत नाही हे तर उघड आहे. त्यामुळे सरकारला मार्ग काढावाच लागेल.''
जम्मू आणि काश्मीरबाबत विशेष दर्जा असलेले कलम ३७० हटवण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ओमर अब्दुल्ला, त्यांचे वडिल नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती या तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांना नजरकैदत ठेवण्यात आले आहे.