मुंबई - सिनेजगतातील आघाडीचे संगितकार ए.आर. रेहमान यांच्या गाण्याची चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळते. लवकरच 'वाह जिंदगी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला ए.आर रेहमान यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन पराग छाबरा हे करत आहेत.
'वाह जिंदगी' चित्रपटाला ए.आर. रेहमानचं संगीत; अनावरण सोहळा संपन्न
सिनेजगतातील आघाडीचे संगितकार ए.आर. रेहमान यांच्या गाण्याची चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळते. लवकरच 'वाह जिंदगी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला ए.आर रेहमान यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन पराग छाबरा हे करत आहेत.
पराग छाबरा यांनी यापूर्वीही ए.आर. रेहमान यांच्यासोबत 'सचिन- द बिलियन ड्र्रिम्स', 'मॉम' आणि 'मोहेनजोंदारो', या चित्रपटात काम केले आहे.
ए.आर. रेहमान यांच्या ट्विटर अकाऊंटवर 'वाह जिंदगी'च्या संगीत सोहळ्याच्या अनावरणाचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत.
'मी या चित्रपटाची कथा एकली होती. त्यानुसार, परागबरोबर चित्रपटाचे संगित तयार केले. प्रेक्षकांनाही ही कथा नक्की आवडेल', असे ए.आर. रेहमान यांनी म्हटले आहे.
'वाह जिंदगी' या चित्रपटात नवे चेहरे झळकणार आहेत. संजय मिश्रा, विजय राज, प्लबिता बोरठाकूर, नविन कस्तुरीया आणि मनोज जोशी हे कलकार झळकणार आहेत. 'मेक इन इंडिया' या कल्पनेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश यादव हे करत आहेत.