मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती क्लीनिकमध्ये जाताना दिसत आहे. अनुष्का बऱ्याच काळापासून एका आजाराने त्रस्त आहे. यापूर्वीही तिच्या आजारासंबधीचे वृत्त समोर आले होते. याच आजारावर सध्या ती उपचार घेत आहे.
अनुष्काला 'बल्जिंग डिस्क' नावाचा आजार आहे. हा आजार कंबरेसंबधी आहे. या आजारामुळे व्यक्ती एकाच ठिकाणी जास्त वेळ बसू शकत नाही. जो एकाच जागेवर जास्त वेळ बसून काम करतो, त्याला हा आजार होण्याची शक्यता असते. अनुष्कालाही याच आजाराने ग्रासले आहे. या आजारावर उपचार घेण्यासाठी ती क्लीनिकच्या बाहेर दिसून आली.