मुंबई -सोशल मीडियावर सध्या बॉलिवूड कलाकार आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. आपले बालपणीचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या बालपणीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळतेय. आज ही अभिनेत्री बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे.
ही चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसुन अनुष्का शर्मा आहे. अनुष्काने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. बालपणीदेखील ती खूपच क्युट असल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळते. तिच्या या फोटोवर विराटनेही कमेंट केली आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दोघेही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. दोघांचेही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अलिकडेच दोघांचा एक हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. शिवाय, त्यांचा एका कार्यक्रमातील व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे.