आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. शनिवारी झालेल्या भारत-श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया-आफ्रिका सामन्याने सेमीफायनलची गणितं सुटली आहेत. भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिल्या सेमीफायनलचा सामना मंगळवारी 9 जुलैला होईल. त्यापूर्वी भारतविरुद्ध श्रीलंका हा सामना रंगतदार ठरला. यावेळी विराट कोहलीला चिअरअप करण्यासाठी अनुष्का शर्मादेखील पोहोचली होती.
विराटला चिअरअप करण्यासाठी ग्राऊंडवर पोहोचली अनुष्का, कॅमेरा पाहताच 'दिली' अशी रिअॅक्शन - cricket
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पहिल्या सेमीफायनलचा सामना मंगळवारी 9 जुलैला होईल. त्यापूर्वी भारतविरुद्ध श्रीलंका हा सामना रंगतदार ठरला. यावेळी विराट कोहलीला चिअरअप करण्यासाठी अनुष्का शर्मादेखील पोहोचली होती.
अनुष्काचे बरेचसे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती विराट तसेच भारतीय संघाला प्रोत्साहन देताना पाहायला मिळते. तर, दुसरीकडे फोटो आणि व्हिडओ जर्नलिस्ट विराल भायानीनेही विराटचा एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे. 'जेव्हा आपली पत्नी आपल्या अवतीभोवती असते तेव्हा', असे कॅप्शन देऊन त्याने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये विराटचे मैदानावरचे काही मजेदार हावभाव पाहायला मिळतात.
विराटला प्रोत्साहन देत असताना अचानक तिची नजर कॅमेराकडे जाते अन् ती आश्चर्यचकीत झालेली पाहायला मिळते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.