महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अनुष्का शर्मा ठरली देशातील सर्वात सामर्थ्यशाली महिला - अनुष्का शर्मा

'फॉर्च्यून इंडिया'च्या यादीत अनुष्काला ३९ क्रमांकाचं स्थान मिळालं आहे. भारतातील सर्वात सामर्थ्यशाली महिलांच्या वार्षिक रँकिंग, त्याचं व्यापार कौशल्य आणि सामाजिक तसेच सांस्कृतिक प्रभाव या सर्व गोष्टींवरुन ही यादी जाहीर करण्यात येते. यामध्ये अनुष्काचा परिचयही देण्यात आला आहे.

अनुष्का शर्मा ठरली देशातील सर्वात सामर्थ्यशाली महिला

By

Published : Sep 22, 2019, 5:04 PM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा 'फॉर्च्यून इंडिया २०१९' च्या यादीमध्ये भारतातील सामर्थ्यशाली महिला म्हणून समावेश झाला आहे. अलिकडेच फॉर्च्यून इंडिया'ने ही यादी जाहीर केली. यामध्ये तब्बल ५० व्यक्तींच्या नावाचा समावेश आहे. या यादीमध्ये बॉलिवूडमधील एकमेव अभिनेत्री अनुष्काची वर्णी लागली आहे.

'फॉर्च्यून इंडिया'च्या यादीत अनुष्काला ३९ क्रमांकाचं स्थान मिळालं आहे. भारतातील सर्वात सामर्थ्यशाली महिलांच्या वार्षिक रँकिंग, त्याचं व्यापार कौशल्य आणि सामाजिक तसेच सांस्कृतिक प्रभाव या सर्व गोष्टींवरुन ही यादी जाहीर करण्यात येते. यामध्ये अनुष्काचा परिचयही देण्यात आला आहे.

अनुष्का शर्माने २००८ साली 'रब ने बनादे जोडी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अल्पावधीतच तिने बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान पटकावलं. तिने आजवर बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहे. तिच्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरही ती चर्चत असते.

हेही वाचा -Happy Daughters Day : अजय देवगन-काजोलची लाडक्या लेकीसाठी भावनिक पोस्ट

विराट कोहलीसोबतचेही तिचे बरेच फोटो व्हायरल होत असतात. अनुष्कानं निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. तिच्या निर्मितीखाली 'एनएच १०', 'फिल्लोरी' यांसारख्या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय डिजीटल प्लॅटफॉर्मवरही तिने एन्ट्री घेतली आहे. अॅमॅझॉन प्राईमसाठी ती एका वेबसीरिजची निर्मिती करत आहे.

हेही वाचा -आयुष्मानच्या 'ड्रीमगर्ल'ची मोहिनी कायम, जाणून घ्या कमाई

ABOUT THE AUTHOR

...view details