मुंबई -महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन असलेला अभिनेता अंकुश चौधरी एक हटके विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाच्या दिवाळीत त्याचा 'ट्रिपल सीट' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अंकुशसोबत २ अभिनेत्री झळकणार आहेत. या चित्रपटातील अंकुश आणि पल्लवी पाटील यांची भावनिक केमेस्ट्री असलेलं गाणं अलिकडेच प्रदर्शित करण्यात आलं आहे.
'रोज वाटे' असे या गाण्याचे बोल आहेत. बेला शेंडेने हे गाणं गायलं आहे. या चित्रपटाला अविनाश विश्वजित यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत लाभले आहे. तर गुरु ठाकूर, मंदार चोळकर, अश्विनी शेंडे, विश्वजित जोशी यांची गीते आहेत.
हेही वाचा - अंकुश चौधरीसोबत 'ट्रिपल सीट'वर बसणाऱ्या ‘त्या’ दोघी कोण? याची उत्सुकता!