मुंबई -छोट्या पडद्यावरून 'पवित्र रिश्ता' मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अंकिता लोखंडेची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तिने 'मणिकर्णिका' चित्रपटातून बॉलिवूडमध्येही एन्ट्री केली. या चित्रपटात तिने 'झलकारी बाई'ची भूमिका साकारली होती. अलिकडेच तिने एका माध्यमाच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने तिचा सुरुवातीचा काळ, तिला आवडणाऱ्या गोष्टी आणि लव्ह लाईफबद्दल चर्चा केली.
अंकिताने या कार्यक्रमात सांगितले, की ती चवथीत असतानाच तिने अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. तेव्हाच तिने मला मोठेपणी अभिनेत्री व्हायचे, असे घरच्यांना सांगितले होते. त्यानंतर ती पुढे मुंबईत आली. येथून तिने तिच्या अभिनयाला सुरुवात केली. 'पवित्र रिश्ता' मालिकेत तिने अर्चनाची भूमिका साकारली होती. त्यामुळे तिने 'अर्चना' म्हणूनच प्रेक्षकांच्या मनात लोकप्रियता मिळवली.