महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मुकेश अंबानीनंतर आता अनिल अंबानी यांनी घेतली ऋषी कपूर यांची भेट - rishi kapoor

काही दिवसांपूर्वीच ते कॅन्सरमुक्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याची गोष्ट लपवून ठेवली होती. मात्र, ते अमेरिकेत कॅन्सरवरच उपचार घेत असल्याचे समोर आले होते.

मुकेश अंबानीनंतर आता अनिल अंबानी यांनी घेतली ऋषी कपूर यांची भेट

By

Published : May 25, 2019, 5:22 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे बऱ्याच महिन्यांपासून अमेरिकेत उपचार घेत आहेत. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी यादरम्यान त्यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्यासोबत ऋषी कपूर यांची भेट घेतली होती. आता त्यांचे भाऊ अनिल यांनीही त्यांच्या पत्नीसोबत ऋषी कपूर यांची भेट घेतली.

काही दिवसांपूर्वीच ते कॅन्सरमुक्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याची गोष्ट लपवून ठेवली होती. मात्र, ते अमेरिकेत कॅन्सरवरच उपचार घेत असल्याचे समोर आले होते. यादरम्यान बी-टाऊनच्या अनेक कलाकारांनी अमेरिकेत जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली. तसेच त्यांच्यासोबत वेळ घालवला. सोशल मीडियावर त्यांचे फोटो देखील शेअर करण्यात आले होते. आता ऋषी कपूर यांनी स्वत: अनील अंबानी आणि त्यांच्या पत्नीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अनिल अंबानी यांनी घेतली ऋषी कपूर यांची भेट

या फोटोंसोबत त्यांनी एक पोस्टही लिहिली आहे. 'तुमच्यासोबत खूप चांगला वेळ गेला. अंशूलची पदवी पूर्ण झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन. दोघांचेही आभार. नीतू या फोटोमध्ये नाही कारण ती माझ्यासाठी जेवण बनवण्यात व्यग्र होती', असे त्यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये लिहिले आहे.

अलिकडेच एका माध्यमाशी बोलताना ऋषी कपूर यांनी ते आता कॅन्सरमधून पूर्ण बरे झाल्याचे सांगितले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्याही संपर्कात असतात. आता ते भारतात कधी परततात याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details