मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन हे आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित अपडेट्स नेहमी सोशल मीडियावर शेअर करीत असतात.
अमिताभ - जया साजरा करीत आहेत ४७ वा लग्नाचा वाढदिवस, बिग बी 3 जून रोजी आपल्या लग्नाचा 47 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. यानिमित्ताने अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर कोलाजही शेअर केला आहे, तसेच एक रहस्यही सांगितले आहे. बच्चनने शेअर केलेला फोटो लग्नाच्या मंडपातील आहेत. फोटोमध्ये अमिताभ जया यांच्या कपाळावर टिळा लावून होम कुंडासमोर बसलेले दिसत आहेत. जया बच्चनने लग्नाचा पोशाख घातला आहे आणि बिग बी शेरवानीमध्ये आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, ''४७ वर्षे..आजच्याच दिवशी...३ जून १९७३.''
अमिताभ - जया साजरा करीत आहेत ४७ वा लग्नाचा वाढदिवस, अमिताभ - जया साजरा करीत आहेत ४७ वा लग्नाचा वाढदिवस, या पोस्टसोबत असलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी एका रहस्याचा खुलासा केला आहे की, ''जंजीर' बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यास मित्रासोबत बच्चन लंडनला जाणार होते. त्यावर त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी विचारले की, सोबत कोण कोण आहेत? त्यावर अमिताभ यांनी सांगितले, की जया असणार आहे. त्यावर हरिवंशराय म्हणाले की, जाण्यापूर्वी तुम्हाला लग्न करावे लागेल, नाही तर नका जाऊ. यावर बच्चन यांनी वडिलांचे म्हणणे मान्य केले आणि त्यांचा विवाह पार पडला.' अमिताभ यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
अमिताभ - जया साजरा करीत आहेत ४७ वा लग्नाचा वाढदिवस, अमिताभ यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अमिताभ - जया साजरा करीत आहेत ४७ वा लग्नाचा वाढदिवस, अमिताभ - जया साजरा करीत आहेत ४७ वा लग्नाचा वाढदिवस, 'बंसी बिरजू' हा अमिताभ आणि जया यांचा पहिला एकत्रित चित्रपट होता. हा चित्रपट १९७२मध्ये रिलीज झाला होता. याशिवाय अमिताभ आणि जया यांनी 'जंजीर', 'अभिमान', 'चुपके चुपके', 'मिली', 'शोले' आणि 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातून एकत्र भूमिका साकारल्या.
अमिताभ - जया साजरा करीत आहेत ४७ वा लग्नाचा वाढदिवस,