मुंबई -छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेला शो 'कौन बनेगा करोडपती'चा ११ वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'दवीयो' और 'सज्जनो' अशी साद घालत आपल्या भारदस्त आवाजात अमिताभ बच्चन यांचे सुत्रसंचालन आणि अंगावर रोमांच उभी करणारी 'केबीसी'ची ट्यून या सर्वांनी आत्तापर्यंत चाहत्यांवर छाप पाडली. यावेळी मात्र, या सिग्नेचर ट्यूनमध्ये थोडा बदल होताना दिसणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा नवा प्रोमो प्रदर्शित झाल आहे.
सर्वसामान्यांच्या स्वप्नांना उभारी देणारा शो म्हणून 'केबीसी'ची ओळख आहे. यावेळी कार्यक्रमात थोड्या प्रमाणात बदल झालेले पाहायला मिळतील. कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यून आणखी खास बनवण्यासाठी प्रसिद्ध संगीतकाराची जोडी अजय-अतुल यांनी आपले विशेष योगदान दिले आहे.