मुंबई -सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. विविध उमेदवार जिंकुन येण्यासाठी प्रचाराच्या तोफा गाजवत आहेत. मतदारांनी आपल्याला निवडुन देण्यासाठी हे उमेदवार अनेक प्रलोभन, आश्वासनही देताना दिसतात. त्यातील किती आश्वासन निवडणुक संपल्यानंतर पुर्ण होताना दिसतात, हे सर्वांनाच माहिती आहे. अशाच आशयावर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक विनोद शेअर केला आहे. हा विनोद सध्या चाहत्यांनी उचलुन धरला आहे.
निवडणुकीच्या काळात 'बिग बीं'नी शेअर केला विनोद, वाचुन तुम्हीही खळखळून हसाल - instagram
सोशल मीडियावर अनेकदा पती-पत्नीवर विनोद फिरत असतात. बिग बी यांनीदेखील पती-पत्नीमधील एक मजेशीर संवाद शेअर केला आहे.
सोशल मीडियावर अनेकदा पती-पत्नीवर विनोद फिरत असतात. बिग बी यांनीदेखील पती-पत्नीमधील एक मजेशीर संवाद शेअर केला आहे. यामध्ये 'पत्नी तिच्या पतीला म्हणते, की लग्नापूर्वी तुम्ही मला हॉटेल, सिनेमा आणि कुठे-कुठे घेऊन जात होते. आता लग्न झाल्यापासून मला घराच्या बाहेरही नेत नाहीत. यावर तिचा पती म्हणतो, निवडणुकीनंतर तू कधी कोणाला प्रचार करताना पाहिलेस का'? या विनोदावर बिग बींनी हास्याच्या ईमोजीदेखील शेअर केल्या आहेत.
त्यांच्या या विनोदावर काही चाहत्यांनी देखील हसण्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी मात्र, 'बिग बीं'नी पत्नीवर अशाप्रकारचा विनोद केल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.