बिलासपूर - महानायक अमिताभ बच्चन सध्या मनाली येथे 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. दरम्यान शूटिंगमधून वेळ काढून त्यांनी बिलासपूर येथील 'लेक व्ह्यू कॅफे' येथे चाहत्यांची भेट घेतली. त्यानंतर ते चंदीगढला रवाना झाले.
बिग बी 'लेक व्ह्यू कॅफे' येथे येणार असल्याची माहिती कोणालाही नव्हती. त्यामुळे त्यांचे आगमन होताच, त्यांची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. सध्या तेथे कडाक्याची थंडी आहे. मात्र, तरीही बिग बींना भेटण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मुख्य रस्त्यापासून ते 'लेक व्ह्यू कॅफे' गर्दी केली होती.
अमिताभ बच्चन यांनी बिलासपुर येथे घेतली चाहत्यांची भेट यावेळी बिग बींनीही आपल्या चाहत्यांसोबत फोटो काढले. तसेच त्यांना ऑटोग्राफही दिला. अमिताभ बच्चन यांनी बिलासपुर येथे घेतली चाहत्यांची भेट हेही वाचा -मनालीच्या चाहत्यांसाठी बिग बींची खास पोस्ट
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुख्य जोडी या चित्रपटात झळकणार आहे. अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
यापूर्वी हा चित्रपट या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु व्हीएफएक्स आणि काही तांत्रिक बाबींमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. आता हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
'ब्रम्हास्त्र'चे चित्रीकरण बल्गेरिया, न्यूयॉर्क आणि मुंबईमध्येही करण्यात आले आहे. आहे. या चित्रपटात मौनी रॉय आणि टॉलीवूड अभिनेता नागार्जुनही आहेत.
'ब्रम्हास्त्र'शिवाय बिग बी आगामी 'चेहेरे', 'गुलाबो सीताबो' आणि 'झुंड' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.
हेही वाचा -क्रिती खरबंदाच्या जागी 'चेहरे' चित्रपटात दिसणार 'ही' टीव्ही अभिनेत्री