मुंबई - बॉलिवूडचा शहंशाह अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसोबत ते नेहमी आपली खासगी आयुष्य असो, की व्यावसायिक गोष्टी ते शेअर करीत असतात.
अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना घरीच जिम करण्याचा सल्ला
अमिताभ बच्चन यांनी जिमला जाण्याचा सल्ला चाहत्यांना दिलाय. परंतु घराबाहेर न पडता घरीच जिम करण्याचा सल्ला त्यांनी दिलाय. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
सध्या ते कोरोना व्हायरससंबधी जागरुकता पसरवण्याचे कामही करीत आहेत. आपल्या पोस्टमधून बिग बी नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या पोस्टमधून लोकांना माहितीही मिळत असते आणि त्यांचे मनोरंजनही होत असते. अलिकडेच अमिताभने एक ट्विट केलंय. याची सध्या खूप चर्चा आहे. आपला फोटो शेअर करीत त्यांनी लिहिलंय, "चलो भैया जिम." लोक सध्या लॉकडाऊनमुळे आपल्या घरात बंद आहेत. मात्र अमिताभ त्यांना जिममध्ये जाण्याचा सल्ला देताहेत. मात्र यासाठी जिमला जाण्याची गरज नसल्याचे अमिताभने सांगितलंय. अमिताभही घरीच आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, "चलो भैया जिम. नंतर भेटूयात. जिम इथेच आहे. घराच्या बाहेर नाही.''
अमिताभ यांच्या या या ट्विटवर भरपूर कॉमेंट्स येत आहेत.व्यावसायिक पातळीवर अमिताभ यांच्या खात्यात अनेकचित्रपट आहेत. यात 'चेहरे', 'झुंड', 'ब्रह्मास्त्र' और 'गुलाबो-सिताबो' या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्या 'गुलाबो सिताबो' हा चित्रपट आता थेट प्रईम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे लवकर थिएटर सुरू होणार नसल्यामुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन स्ट्रिमिंग करण्याचा निर्णय निर्मात्याने घेतलाय. येत्या १२ जूनला हा सिनेमा प्राईम व्हिडिओवर स्ट्रिमिंग होईल.