महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

HBD Amitabh Bachchan: आजच्या तरुणाईलाही लाजवतील 'असे' बिग बींचे ५ लूक्स - Amitabh bachchan bday story

वर्षानुवर्षापासून अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्वाची क्रेझ पाहायला मिळते. आजही ते आपल्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असतात. त्यांच्या याच लूक्सकडे पाहुन फॅशनची नवी व्याख्या सिद्ध होते.

HBD Amitabh Bachchan: आजच्या तरुणाईलाही लाजवतील 'असे' बिग बींचे ५ लूक्स

By

Published : Oct 11, 2019, 1:12 PM IST


मुंबई -बॉलिवूडचे 'शहनशाह' महानायक अमिताभ बच्चन आज त्यांचा ७७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या सिनेकारकिर्दित त्यांनी आत्तापर्यंत २०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. आपल्या अभिनयासोबतच ते आपल्या हटके लूक्समुळेही चर्चेत राहतात.

वर्षानुवर्षापासून त्यांच्या व्यक्तिमत्वाची क्रेझ पाहायला मिळते. आजही ते आपल्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असतात. त्यांच्या याच लूक्सकडे पाहुन फॅशनची नवी व्याख्या सिद्ध होते.

बिग बी चित्रपटाच्या कथानकाप्रमाणेच त्यांच्या लूक्सकडेही जास्त लक्ष देतात. आपला लूक नेहमीपेक्षा वेगळा असावा यासाठी ते वेगवेगळे प्रयोगही करताना दिसतात. बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी भल्याभल्यांना थक्क करतील असे लूक साकारले आहेत.

हेही वाचा -७७ व्या वयात पदार्पण करताना बिग बींनी सांगितली अपुरी स्वप्नं

आपल्या चेहऱ्यावर तसेच लूक्सवर वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी ते नेहमी तयार असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपले हे हटके लूक चाहत्यांसाठी शेअर करत असतात.

'अँग्री यंग मॅन' अशी ओळख तयार झालेले अमिताभ बच्चन आज बॉलिवूडचे खऱ्या अर्थाने शहनशाह ठरले आहेत.

हेही वाचा -अमिताभ बच्चन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव... पाहा, बिग बींच्या गाजलेल्या ५० भूमिकांचा कोलाज

ABOUT THE AUTHOR

...view details