मुंबई- काही दिवसांपूर्वी #MeToo मोहिमेचे वादळ बॉलिवूडमध्ये सुरू होते. यादरम्यान अनेक कलाकारांचे खरे चेहरे जगासमोर आले. आता चित्रपटसृष्टीतील याच वास्तवावर आधारित चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे मीटू मोहिमेतून ज्यांच्यावर लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला, असे आलोक नाथ या चित्रपटात न्यायाधीशाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.
'मीटू'वरील चित्रपटात बलात्काराचा आरोप असलेले आलोक नाथ न्यायाधीशांच्या भूमिकेत? - main bhi
आलोक नाथ यांनी स्वतः या चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दलच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. होय, मी या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. तुम्हाला काही त्रास आहे का? असा प्रश्न त्यांनी केला आहे.
'मैं भी' असे या चित्रपटाचे शीर्षक असणार आहे. नासिर शेख या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार आलोक नाथ यांनी स्वतः या चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दलच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. होय, मी या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. तुम्हाला काही त्रास आहे का? असा प्रश्न त्यांनी केला आहे.
सध्या मी इतर कोणत्याही चित्रपटात काम करत नाही. मात्र, या चित्रपटाचे चित्रीकरण आधीच केले आहे आणि निर्मात्यांसाठी मी या चित्रपटात काम केलं आहे, त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ द्या, असेही आलोक नाथ यांनी म्हटलं आहे.