मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगनाने आतापर्यंत कोणत्याही दिग्गज अभिनेत्याच्या भूमिकेशिवाय अनेक चित्रपट गाजवले आहे. यात क्वीन, मणिकर्णिका, तनु वेड्स मनुसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र, चित्रपटांसोबतच कंगना सतत चर्चेत असते तिच्या परखड आणि थेट बोलण्याने. तिच्या याच स्वभावावर आता आलियानं आपलं मत मांडलं आहे.
कंगनाच्या परखड बोलण्यावर आलिया भट्ट म्हणते... - politics
माझे वडील म्हणजेच महेश भट्ट मला सांगतात, या जगात आधीच खूप जास्त मतं आहेत, त्यातीलच तुझं एक असेल.
कंगना कोणत्याही विषयावर थेट बोलू शकते आणि तिच्या या सवयीची मी खरंच इज्जत करते, असं आलियानं म्हटलं आहे. मात्र, एखाद्या विषयावर मला काही वाटलं तर मी त्यावर लगेचच मत न देता ते माझ्याच जवळ ठेवत असल्याचंही आलिया म्हटली. ती पुढे म्हणाली, माझे वडील म्हणजेच महेश भट्ट मला सांगतात, या जगात आधीच खूप जास्त मतं आहेत, त्यातीलच तुझं एक असेल. त्यामुळेच मी माझं मत जगासमोर न मांडता माझ्याजवळच ठेवत असल्याचं तिनं स्पष्ट केलं.
कंगनाने काही दिवसांपूर्वीच आलिया, रणबीर आणि इतर कलाकारांना राजकारणाबद्दल न बोलल्यामुळे चांगलंच सुनावलं होतं. इतकंच काय तर तिने रणबीरला यासाठी बेजबाबदारही म्हटलं होतं. कदाचित म्हणूनच आलियाने तिच्या याच प्रश्नाला उत्तर दिलं आहे.