मुंबई- काही काळातच चित्रपटसृष्टीत आपलं स्थान भक्कम करणाऱ्या आलिया भट्टचा आज २६ वा वाढदिवस आहे. आलियाने २०१२ मध्ये आलेल्या स्टुडंट ऑफ द ईअर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने पहिल्याच चित्रपटानंतर आलिया तरूणांच्या गळ्यातील ताईत बनली.
B'day Spcl: आलिया-वरूणच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती - student of the year
आतापर्यंत वरूण आणि आलियाने ३ चित्रपटांत स्क्रीन शेअर केली आहे. यात 'स्टुडंट ऑफ द ईअर', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' आणि 'हंम्टी शर्मा की दुल्हनिया', या चित्रपटांचा समावेश आहे
आलिया आणि वरूणच्या जोडीला पडद्यावर नेहमीच चांगली पसंती मिळाली. 'स्टुडंट ऑफ द ईअर' आलिया, वरूण आणि सिद्धार्थ कपूर या तिघांचाही पहिला चित्रपट होता. आतापर्यंत वरूण आणि आलियाने ३ चित्रपटांत स्क्रीन शेअर केली आहे. यात 'स्टुडंट ऑफ द ईअर', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' आणि 'हंम्टी शर्मा की दुल्हनिया', या चित्रपटांचा समावेश आहे. हे तिन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. आता लवकरच ती 'कलंक' चित्रपटातही वरूणसोबत झळकणार आहे. त्यामुळे, दोघांचेही चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या जोडीच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता लोकांना त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चांगलीच भावत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
'कलंक'शिवाय आलिया लवकरच 'ब्रह्मास्त्र', 'आरआरआर' आणि 'स्टुंडट ऑफ द ईअर २' चित्रपटांत झळकणार आहे. मात्र, 'स्टुडंट ऑफ द ईअर'मध्ये ती पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असणार आहे. अभिनेत्रीशिवाय आलिया एक उत्तम गायकही आहे. आतापर्यंत तिने १७ हून अधिक चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत.