मुंबई -'खिलाडी' अक्षय कुमार याचा ९ सप्टेंबर रोजी ५२ वा वाढदिवस होता. अक्षय कुमारची फॅन फोलोविंग प्रचंड तगडी आहे. त्यामुळेच त्याच्या वाढदिवशी चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा भरभरुन वर्षाव केला होता. वाढदिवसानिमित्त त्याच्या फॅनक्लबने काही अनाथआश्रमांना भेटी दिल्या. कोणी रक्तदान शिबीर आयोजित केलं होते. तर, काहींनी विविध उपक्रम राबवले. चाहत्यांचं हे अफाट प्रेम पाहून तो भारावला आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांचे आभार मानले आहेत.
अक्षय कुमार इंग्लंडमध्ये त्याच्या कुटुंबीयासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. आपल्या वाढदिवशी चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करत त्याने आभार मानले. माझा वाढदिवस स्पेशल बनवण्याकरता मी सर्वांचा आभारी आहे, असे त्याने या व्हिडिओवर कॅप्शन दिलं आहे.
हेही वाचा-एकच आयुष्य मिळालंय, ते नीट जगा; वाढदिवशी अक्षयनं शेअर केली पोस्ट
अक्षयने शेअर केलेल्या या ३ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये त्याने बॉलिवूड कलाकारांचे आभार मानले आहेत. त्याच्या फॅन क्लबने जे उपक्रम राबवले, त्यांचे विशेष आभार त्याने मानले आहेत. अक्षय कुमारच्या वाढदिवशीच 'पृथ्वीराज' चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं यशराज फिल्मसोबत तो एकत्र येणार आहे.
हेही वाचा -पाचवीत असताना मराठी शिक्षिकेच्या प्रेमात पडला अक्षय, सांगितला मजेदार किस्सा
यावर्षी अक्षयचे 'केसरी' आणि 'मिशन मंगल' हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. या दोन्हीही चित्रपटांना १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. आता पुढच्या वर्षी देखील त्याचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये 'लक्ष्मी बाँब', 'बच्चन पांडे' आणि 'सूर्यवंशी', 'पृथ्विराज' या चित्रपटांचा समावेश आहे.
हेही वाचा-पुढच्या वर्षी अक्षय कुमार गाजवणार बॉक्स ऑफिस, 'हे' चित्रपट होणार प्रदर्शित