महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'शैतान का साला' बनुन 'हाऊसफुल ४'चा 'बाला' प्रेक्षकांच्या भेटीला, नवं गाणं प्रदर्शित - housefull songs

अक्षय कुमारचा या चित्रपटात पुनर्जन्म पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबत रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती खरबंदा, पुजा हेगडे, क्रिती सेनॉन, यांच्याही पुनर्जन्माची धमाल कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

'शैतान का साला' बनुन 'हाऊसफुल ४'चा 'बाला' प्रेक्षकांच्या भेटीला, नवं गाणं प्रदर्शित

By

Published : Oct 8, 2019, 8:05 AM IST

मुंबई - अभिनेता अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल ४' चित्रपट काहीच दिवसांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'हाऊसफुल'च्या सीरिजची प्रेक्षकांमध्ये विशेष क्रेझ पाहायला मिळते. त्यामुळेच 'हाऊसफुल ४'ची देखील सर्वांना आतुरता लागली आहे. या चित्रपटातील पहिलं गाणं 'एक चुम्मा' हे देखील सोशल मीडियावर हिट ठरलं आहे. आता या चित्रपटातलं दुसरं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

'शैतान का साला' हे या गाण्याचं नाव आहे. अक्षय कुमारने या गाण्याचं पोस्टर शेअर करुन गाण्याचा टीजरही शेअर केला होता. या गाण्यात अक्षय कुमारची धमाल कॉमेडी पाहायला मिळते. या गाण्यात अक्षयचा १४१९ च्या काळातील 'राजकुमार बाला'चा लूक पाहायला मिळतो.

हेही वाचा -Durga Puja 2019: काजोलने आई तनुजासोबत साजरी केली दुर्गापूजा

अक्षय कुमारचा या चित्रपटात पुनर्जन्म पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबत रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती खरबंदा, पुजा हेगडे, क्रिती सेनॉन, यांच्याही पुनर्जन्माची धमाल कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

फरहाद समजी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर, साजिद नादियाडवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. २५ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राणा दुगबत्ती, चंकी पांडे, सौरभ शुक्ला, जॉनी लिवर, जेमी लिवर आणि इतरही कलाकार यामध्ये झळकणार आहेत.

हेही वाचा -बॉक्स ऑफिसवर टायगर - हृतिकचं 'वॉर' कायम, अवघ्या ५ दिवसात रचले 'हे' विक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details