महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ऑटोरिक्षामध्ये साकारली अनोखी 'बाग', अक्षय कुमारने शेअर केले फोटो - akshay kumar

अक्षयने हे फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावरही या रिक्षाचालकाचं कौतुक होत आहे. तसेच, पर्यावरण संवर्धनाचा हा आगळा संदेश सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे.

ऑटोरिक्षामध्ये साकारली अनोखी 'बाग', अक्षय कुमारने शेअर केले फोटो

By

Published : Sep 19, 2019, 12:18 PM IST

मुंबई - 'झाडे लावा झाडे जगवा' असा संदेश नेहमीच दिला जातो. मात्र, प्रत्यक्षात याची अंमलबजावणी फारच कमी लोक करताना दिसतात. मात्र, एका रिक्षा चालकाने 'पर्यावरण वाचवा' हा संदेश देण्यासाठी अनोखा प्रयोग साकारला आहे. त्याने चक्क आपल्या रिक्षामध्येच वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली आहेत. या रिक्षावाल्याचं कौतुक करत अक्षय कुमारनेही त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अक्षयने हे फोटो शेअर करुन रिक्षाचालकाच्या या प्रयोगाची प्रशंसा केली आहे. आज शूटिंगला जात असताना मला एक रिक्षा दिसली जी पूर्णपणे झाडांनी व्यापलेली होती. या रिक्षाचे सुखद दर्शन घडले. तो एक आनंददायी असा क्षण होता. त्यामुळे या व्यक्तीचा मला खूप अभिमान आहे', असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिले आहे.

हेही वाचा-'खिलाडी' कुमारची मेट्रो राईड, शेअर केला अनुभव

अक्षयने हे फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावरही या रिक्षाचालकाचं कौतुक होत आहे. तसेच, पर्यावरण संवर्धनाचा हा आगळा संदेश सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा-'छिछोरे' चित्रपटाची १०० कोटीच्या क्लबमध्ये एन्ट्री, सुशांतच्या करिअरमधला ठरला दुसरा सुपरहिट चित्रपट

ABOUT THE AUTHOR

...view details