मुंबई - बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत खेळावर आधारित बरेचसे चित्रपट पाहायला मिळाले. आता फुटबॉल स्पर्धेवर आधारित 'मैदान' हा चित्रपट देखील तयार होत आहे. आजपासूनच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे बॉलवूडचा सिंघम अजय देवगन या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
'मैदान' चित्रपटात दिसणार फुटबॉल मॅचचा थरार, 'हा' अभिनेता मुख्य भूमिकेत - बोनी कपूर
१९५२ ते १९६२ हा भारतीय फुटबॉलचा सुवर्ण काळ मानला जातो. या चित्रपटातूनही फुटबॉल स्पर्धेचा थरार पडद्यावर पाहायला मिळेल.
'मैदान' चित्रपटात दिसणार फुटबॉल मॅचचा थरार, 'हा' अभिनेता मुख्य भूमिकेत
१९५२ ते १९६२ हा भारतीय फुटबॉलचा सुवर्ण काळ मानला जातो. या चित्रपटातूनही फुटबॉल स्पर्धेचा थरार पडद्यावर पाहायला मिळेल. अजय देवगनसोबत या चित्रपटात किर्थी सुरेश ही अभिनेत्री झळकणार आहे. तर, 'बधाई हो' चित्रपटाचे दिग्दर्शक रविंद्रनाथ शर्मा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
बोनी कपूर, आकाश चावला आणि अरुनवा जॉय सेनगुप्ता हे या चित्रपटाची निर्माती करत आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.