मुंबई -बॉलिवूडचा 'सिंघम' म्हणून ओळखला जाणारा अजय देवगन 'दे दे प्यार दे' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात त्याच्यासोबत तब्बु आणि रकुल प्रित या अभिनेत्री झळकल्या. या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अजय-तब्बु आणि रकुलची केमेस्ट्री प्रेक्षकांवर छाप पाडत आहे. अलिकडेच या चित्रपटाने कमाईत शंभर कोटीचा आकडा गाठला आहे.
'दे दे प्यार दे' चित्रपटाची जादु दोन आठवड्यानंतरही सिनेमागृहात कायम आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ८६.७६ कोटींची कमाई केली आहे. तर विदेशातील बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने १५ कोटींची कमाई केली आहे.