मुंबई - बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या रायने आत्तापर्यंत तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. मात्र, बॉलिवूडच्या या सौंदर्यवतीचा कधीही न पाहिलेला अंदाज आगामी 'मेलफिसेंट' या हॉलिवूडच्या चित्रपटात पाहता येणार आहे. ऐश्वर्याने या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी अँजेलिना जोलीच्या पात्राला आवाज दिला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ऐश्वर्याने हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
'मेलफिसेंट' या चित्रपटात अँजेलिना जोलीची नकारात्मक भूमिका आहे. तिच्या या पात्रासाठी ऐश्वर्याने आवाज दिला आहे. ऐश्वर्यानेही अशात प्रकारचा राक्षसी अवतार करत हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.