मुंबई -आदित्य रॉय कपूर, दिशा पटाणी, कुणाल खेमू आणि अनिल कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'मलंग' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
बऱ्याच रहस्यांनी भरलेल्या या ट्रेलरमध्ये दिशा पटाणीचा ग्लॅमरस लूक, आदित्य रॉय कपूरची शरीरयष्टी, अनिल कपूर आणि कुणाल खेमूची दमदार झलक पाहायला मिळते. यातील प्रत्येक कलाकाराच्या तोंडी असलेला 'जान लेना' हा डायलॉग या चित्रपटाची उत्कंठा वाढवतो.