महाराष्ट्र

maharashtra

दिलीप वेंगसरकरांच्या भूमिकेत मराठमोळा आदिनाथ कोठारे, पाहा '८३'ची संपूर्ण टीम

By

Published : Jan 21, 2020, 4:33 PM IST

'८३' चित्रपटात रणवीरशिवाय आदिनाथ कोठारे, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकारदेखील भूमिका साकारत आहेत.

Character poster of 83 The Film
दिलीप वेंगसरकरांच्या भूमिकेत मराठमोळा आदिनाथ कोठारे, पाहा '८३'ची संपूर्ण टीम

मुंबई -क्रिकेट विश्वचषक सामन्यामध्ये ऐतिहासिक ठरलेल्या १९८३ सालच्या विश्वचषकावर आधारित '८३' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग हा कपिल देव यांच्या भूमिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटात इतरही बऱ्याच कलाकारांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. रणवीरने या सर्वांचे पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

'८३'ची संपूर्ण टीम

२५ जून १९८३ साली भारताने प्रथमच विश्वचषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. १९७५ आणि १९७९ च्या विश्वचषकातील भारताची कामगिरी पाहता या स्पर्धेत कपिलदेव आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. मात्र, या संघाने चमत्कार घडवून देशवासियांचे स्वप्न पूर्ण केले.

'८३'ची संपूर्ण टीम
याच विश्वचषक सामन्यावर आधारित कबीर खान दिग्दर्शित '८३' हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
'८३'ची संपूर्ण टीम
'८३'ची संपूर्ण टीम

'८३' चित्रपटात रणवीरशिवाय आदिनाथ कोठारे, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार देखील भूमिका साकारत आहेत. या सर्व कलाकारांचे फर्स्ट लुक प्रदर्शित झाले आहेत.

'८३'ची संपूर्ण टीम
'८३'ची संपूर्ण टीम

माजी क्रिकेट कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणीयांच्या भूमिकेत आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी आणि सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे. तर, आदिनाथ कोठारे हा दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, चिराग पाटील हा त्याचेच वडील संदीप पाटील यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

'८३'ची संपूर्ण टीम
'८३'ची संपूर्ण टीम

१० एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

'८३'ची संपूर्ण टीम
'८३'ची संपूर्ण टीम
'८३'ची संपूर्ण टीम

ABOUT THE AUTHOR

...view details