महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

फॅशनिस्टा सई ताम्हणकरचे आकर्षक ‘सारी-लूक्स’!

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाते. सई पाश्चिमात्य परिधानांमध्ये छान दिसतेच आणि भारतीय पेहरावांत तिचे सौंदर्य अजूनच खुलून येते, खासकरून साडीमध्ये. ती नेहमीच तिच्या ‘सारी-लूक’ चे फोटोज आपल्या अधिकृत पेजवर पोस्ट करीत असते. त्यातील तिचे साडीतले काही लूक्स.

अभिनेत्री सई ताम्हणकर न्यूज
अभिनेत्री सई ताम्हणकर न्यूज

By

Published : Jan 17, 2021, 3:54 PM IST

मुंबई -महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाते. ती मराठी चित्रपटांची सुपरस्टार आहे आणि अधनं मधनं ती काही हिंदी चित्रपटांतूनही दिसत असते. ही प्रतिभावान अभिनेत्री तिच्या भूमिकेनुसार आणि आवश्यकतेनुसार मोहक वा अनाकर्षक दिसण्यासाठी सुद्धा मेहनत घेत असते. परंतु खासगी आयुष्यात सई नेहमीच ग्लॅमरस लूकमध्ये दिसून येते. तिच्या समाज माध्यमांवरील फोटोज याची साक्ष देतील.

सई ताम्हणकरचा आकर्षक ‘सारी-लूक’
सई ताम्हणकरचा आकर्षक ‘सारी-लूक’

हेही वाचा -सर्वांर्थानं आजच्या पिढीचं प्रतिनिधीत्व करणारा चित्रपट, ‘हॅशटॅग प्रेम’!

सई ताम्हणकर पाश्चिमात्य परिधानांमध्ये छान दिसतेच आणि भारतीय पेहरावांत तिचे सौंदर्य अजूनच खुलून येते, खासकरून साडीमध्ये. तिला स्वतःला साडी खूप आवडते व त्याच कारणामुळे तिने आपली बालमैत्रीण श्रुती भोसलेसोबत साड्यांच्या व्यवसायात शिरून ‘द सारी शॉप’ हा ब्रँड देखील लाँच केला आहे. सई नेहमीच तिच्या ‘सारी-लूक’ चे फोटोज आपल्या अधिकृत पेजवर पोस्ट करीत असते. त्यातील तिचे साडीतले काही लूक्स.

सई ताम्हणकरचा आकर्षक ‘सारी-लूक’
सई ताम्हणकरचा आकर्षक ‘सारी-लूक’
गेल्या वर्षाच्या सुरुवातीस सई ताम्हणकर ‘धुरळा’ मध्ये दिसली होती आणि आता तिचा ‘मीडियम स्पाईसी’ या वर्षाच्या पूर्वार्धात प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. सई ताम्हणकर सध्या सोनी मराठीवरील मराठी विनोदी प्रहसन कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्ये 'जज'ची भूमिका निभावतेय व त्यातील तिचे फॅशनेबल कॉस्च्युम्स नेहमीच चर्चेत असतात.
सई ताम्हणकरचा आकर्षक ‘सारी-लूक’
सई ताम्हणकरचा आकर्षक ‘सारी-लूक’

हेही वाचा -प्रथमेश परब अभिनित ‘ओह माय घोस्ट्’ चा टिझर झाला प्रकाशित!

ABOUT THE AUTHOR

...view details