महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'मी सीएए, एनआरसीचे समर्थन करत नाही, त्यामुळे माझं विभागलं जाईल' - Pooja Bhatt Reaction Against CAA news

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात 'मुंबई बाग' या नावाने मुंबई येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी देखील आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. काही कलाकार या कायद्याविरोधात आंदोलन करण्यासाठी समोर आले आहेत.

Pooja Bhatt Reaction Against CAA, Mumbai Bagh protest in Mumbai, Actress Pooja Bhatt Reaction Against CAA,  अभिनेत्री पूजा भट्ट न्यूज, Pooja Bhatt Reaction Against CAA news, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पूजा भट्टची प्रतिक्रिया
'सीएए'मुळे माझं घर विभागलं जाईल, अभिनेत्री पूजा भट्टची प्रतिक्रिया

By

Published : Jan 28, 2020, 11:17 AM IST

मुंबई -नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीन बाग परिसरात मागील एक महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. मुंबईतही या आंदोलनाचे पडसाद उमटले आहे. 'मुंबई बाग' या नावाने काही दिवसांपासून येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी देखील आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. काही कलाकार या कायद्याविरोधात आंदोलन करण्यासाठी समोर आले आहेत. यामध्ये अभिनेत्री पूजा भट्टने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'राजकारणी नेत्यांना माझी विनंती आहे, की देशात उठणाऱ्या आवाजांना ऐका. देशात राहणाऱ्या महिला मग त्या शाहीन बागमधील असो किंवा लखनऊमधील, आता आम्ही थांबणार नाही. मी लोकांना याबद्दल आणखी बोलण्यासाठी प्रेरीत करेल. मी सीएए आणि एनआरसी यांचे समर्थन करत नाही. कारण, यामुळे माझे घर विभागले जाईल', अशी प्रतिक्रिया पूजा भट्टने दिली आहे.

हेही वाचा -समलैंगिक भूमिकेविषयी आयुष्मानच्या मुलाची प्रतिक्रिया, ताहिराने केलं ट्विट

दरम्यान, शाहीन बाग परिसरातील आंदोलनामुळे दिल्ली शहरातून नोएडाला जाण्यासाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थी, स्थानिक नागरिकांनी येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे.

हेही वाचा -अक्षयच्या 'बेल बॉटम'ची नवी तारीख तर दीपिकाच्या नव्या चित्रपटाची घोषणा, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी

ABOUT THE AUTHOR

...view details