शिर्डी (अहमदनगर) - दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा हिने आज आपला जोडीदार विघ्नेश शिवन याच्यासोबत शिर्डीत येऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. तिने आज साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली. शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायत यांनी अभिनेत्री नयनतारा आणि विघ्नेश यांना साईबाबांचा आशिर्वाद म्हणून शल आणि गुलाब फुलांचा गुच्छ देऊन सत्कार केला.
बऱ्याच दिवसापासुन साईच्या दर्शनासाठी शिर्डीत येण्याची इच्छा होती. मात्र कोरोनामुळे शिर्डी साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येता येत नव्हते. गेल्या 7 ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व धार्मिकस्थळे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली असल्याने आज शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याचा योग्य आला असल्याच यावेळी नयनताराने म्हंटलंय. आज शिर्डी साईबाबांचे दर्शन घेऊन मनाला समाधान वाटले असून साईबाबाचा दर्शनाने पुढील कार्यास प्रोत्साहन मिळणार आहे, असेही ती म्हणाली.