महाराष्ट्र

maharashtra

अभिनेता अल्लू अर्जुनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

By

Published : Apr 29, 2021, 9:18 PM IST

तेुलुगू अभिनेता अल्लू अर्जुन याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वतःच सोशल मीडियावरुन ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. तो सध्या घरी क्वरंटाइनमध्ये उपचार घेत आहे.

Actor Allu Arjun
अल्लू अर्जुन

मुंबई - तेुलुगू अभिनेता अल्लू अर्जुनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याने स्वतःच सोशल मीडियावरुन ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. तो सध्या घरी क्वारंटाइनमध्ये उपचार घेत आहे.

अल्लू अर्जुनने इन्स्टाग्रामवर एक निवेदन पोस्ट केले आणि आपल्या चाहत्यांना आपण ठीक असून प्रकृतीची चिंता करू नका अशी विनंती केली आहे.

अल्लू अर्जुनने म्हटलंय "सर्वांना नमस्कार! मी कोविडची पॉझिटिव्ह चाचणी केली आहे. मी स्वत: ला घरी अलग केले आहे आणि मी सर्व प्रोटोकॉल पाळत आहे. जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांना चाचणी करण्याची विनंती करतो. घरी रहा, सुरक्षित रहा आणि लसीकरण करा."

अल्लू अर्जुनसाठी अनेक चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थनाही केल्या जात आहेत. व्यावसायिक आघाडीवर अर्जुनने 'एए 21' चित्रपटाचे शूट पूर्ण केले आहे आणि 'पुष्पा' या नावाचा आगामी चित्रपटात तो करीत आहे. रेड सँडल तस्करीवर आधारित हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे.

हेही वाचा - 'सत्यमेव जयते २'चे रिलीज आणखी लांबणीवर

ABOUT THE AUTHOR

...view details