मुंबई - बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानची बहीण निखत खान ही मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नुसोबत ती 'सांड की आँख' या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. बऱ्याच काळापासून या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. अलिकडेच तापसी आणि भूमीने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. शार्पशूटर दादी चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात निखत खानचीही मुख्य भूमिका असणार आहे.
आमिर खानच्या बहिणीची बॉलिवूड एन्ट्री, 'या' चित्रपटात साकारणार भूमिका - prakashi tomar
बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानची बहीण निखत खान ही मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे
'सांड की आँख' या चित्रपटात मुष्टीयोद्धा विनीत कुमार हा देखील भूमिका साकारत आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, निखत खानचा हा पदार्पणीय चित्रपट आहे. या चित्रपटात ती महाराणीच्या भूमिकेत झळकणार आहे. या भूमिकेसाठी निखत खान परिपूर्ण असल्याचे चित्रपट निर्मात्यांनी म्हटले आहे.
भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नु या चित्रपटात शार्पशूटर दादी चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टरही काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले आहेत. यामध्ये तापसी आणि भूमी दोघीही वयोवृद्ध महिलांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. २५ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.