महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'सिंघम'ला भेटतो 'सिम्बा', दोघांनाही मिळतो सुर्यवंशी...२७ मार्चला होणार 'धमाका' - Ajay Devgan latest news

सिंघम आणि सिम्बाच्या यशानंतर रोहित शेट्टी आता सुर्यवंशी चित्रपट घेऊन येत आहे. विशेष म्हणजे अजय देवगण, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार या तिन्ही सुपरस्टार्सच्या भूमिका यात आहेत.

अजय देवगण, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार

By

Published : Oct 10, 2019, 8:17 PM IST

रोहित शेट्टीचा आगामी 'सुर्यवंशी' चित्रपटातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'सिंघम' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील अजय देवगण आणि 'सिम्बा' चित्रपटातील रणवीर सिंगच्या धडाकेबाज चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफानी कमाई केली होती. आता अक्षय कुमार, रणवीर आणि अजय देवगण हे तिघेही पोलिसांच्या भूमिकेतील कलाकार बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा विक्रम रचण्यासाठी सज्ज झाले आहेत.


अक्षयने शेअर केलेल्या फोटोत तीन सुपरस्टार एकत्र दिसत आहेत. रणवीर सिंग आणि अजय देवगण पोलिसांच्या कपड्यात दिसत असून अक्षय त्यांच्या खांद्यावर हात ठेवलेला दिसत असून त्याच्याही अंगावर खाकी वर्दी आहे. अक्षयच्या मागे पोलिसांची फौज मोहिमेसाठी रवाना होत असल्याचे दिसत आहे.

पोलिसांच्या वर्दीतील देसी अॅवेंजर्स. जेव्हा 'सिंघम'ला भेटतो 'सिम्बा' आणि दोघांनाही मिळतो 'सुर्यवंशी' तेव्हा केवळ आतषबाजीची अपेक्षा नाही तर २७ मार्चला ब्लास्ट होणार असल्याचा आशय अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिलाय.

ABOUT THE AUTHOR

...view details