महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

औरंगाबादेत उच्च दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे ३ शेतकऱ्यांची घरे जळून खाक - Fire

गलवाडा येथील शामराव जाधव, धनराज जाधव, दत्तू जाधव, अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. या आगीत संपूर्ण घरासह अन्नधान्य, संसाराचे साहित्य आणि विद्युत उपकरणे, असे प्रत्येकी जवळपास १ लाखाच्या दरम्यान नुकसान झाले आहे.

औरंगाबादेत उच्च दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे ३ शेतकऱ्यांची घरे जळून खाक

By

Published : Jun 23, 2019, 7:59 AM IST

Updated : Jun 23, 2019, 8:18 AM IST

औरंगाबाद -सोयगाव तालुक्यातील गलवाडा या गावात शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक उच्च दाबाचा विद्युत वीजपुरवठा झाल्याने ३ शेतकऱ्यांची घरे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घरातील साहित्य जळून खाक झाल्यामुळे ३ कुटुंब उघड्यावर पडले आहे.

गलवाडा येथील शामराव जाधव, धनराज जाधव, दत्तू जाधव, अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. या आगीत संपूर्ण घरासह अन्नधान्य, संसाराचे साहित्य आणि विद्युत उपकरणे, असे प्रत्येकी जवळपास १ लाखाच्या दरम्यान नुकसान झाले आहे.

औरंगाबादेत उच्च दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे ३ शेतकऱ्यांची घरे जळून खाक

शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक उच्च दाबाचा विद्युत वीजपुरवठा झाल्याने इतर ग्रामस्थांच्या घरातील टीव्ही, पंखा आणि इतर उपकरणे जाळली आहेत. याबाबत महसूल विभागाकडून या घटनेची पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे.

Last Updated : Jun 23, 2019, 8:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details