मुंबई -बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेला शाहरुख खानने चित्रपटसृष्टीत २७ वर्षे पूर्ण केली आहेत. त्याची आयकॉनिक स्टाईल आणि रोमॅन्टीझमने वर्षानुवर्षापासून चाहत्यांवर गारुड केले आहे. 'दिवाना' चित्रपटातून त्याने बॉलिवूड पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट बॉलिवूडला दिले. शाहरुखचे फॅनफॉलोविंग फक्त भारतातच नाही, तर विदेशातही पाहायला मिळते. जगभरातील चाहते त्याच्या अभिनयाचे दिवाने आहेत. सोशल मीडियावर त्याच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
'किंग खान'ची सिनेसृष्टीत २७ वर्षे पूर्ण, चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव - king khan
शाहरुखचा बॉलिवूड प्रवास हा आजच्या तरुणाईसमोर प्रेरणादायी ठरतो. सर्वसामान्य व्यक्ती ते बॉलिवूडचा सुपरस्टार हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्याने अनेक कठिण परिस्थितीला सामोरे जावुन त्याचे आजचे स्थान निर्माण केले आहे.
'किंग खान'ची सिनेसृष्टीत २७ वर्षे पूर्ण, चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
शाहरुखचा बॉलिवूड प्रवास हा आजच्या तरुणाईसमोर प्रेरणादायी ठरतो. सर्वसामान्य व्यक्ती ते बॉलिवूडचा सुपरस्टार हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्याने अनेक कठिण परिस्थितीला सामोरे जावुन त्याचे आजचे स्थान निर्माण केले आहे.
सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी त्याला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
Last Updated : Jun 25, 2019, 1:18 PM IST