मुंबई - गल्ली बॉय चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. याचा सीक्वल येईल अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे. गल्ली बॉयच्या दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी याबद्दल सुतोवाच केले आहे. क्रिटीक्स चॉईस अवॉर्ड सोहळ्यात त्या बोलत होत्या.
झोया म्हणाल्या, "तुमच्यासारख्या क्रिटीक्सनी चित्रपटाचे कौतुक केल्यानंतर बॉक्य ऑफिसवरही चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. ज्याच्यावर तुमचा भरोसा आहे अशा गोष्टी प्रमाणिकपणे, खरेपणाने केल्यानंतर जे काही घडते ते चांगलेच असते असे मला वाटते. तुम्ही अंतिम परिणामाकडे पाहिले पाहिजे. तुम्ही प्रक्रिया एन्जॉय केली पाहिजे."