महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ज्यांच्या शब्दांनी जीवन अधिक सुंदर बनवलं, गुलजार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव - रितेश

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं गुलजार यांच्यासोबतचा आपला एक फोटो शेअर करत म्हटलं, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं....आमचं धन्यवादही पुरेस नसेल इतकं सुंदर तुम्ही आमचं आयुष्य बनवलं...हॅपी बर्थडे गुलजार.

गुलजार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

By

Published : Aug 18, 2019, 8:08 PM IST

मुंबई- सुप्रसिद्ध गीतकार, कवी, पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक आणि नाटककार गुलजार यांचा आज वाढदिवस. याच निमित्ताने चित्रपसृष्टीतील अनेकांनी गुलजार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गुलजार यांच्याच कवितेच्या आणि गाण्यांच्या काही ओळी या कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं गुलजार यांच्यासोबतचा आपला एक फोटो शेअर करत म्हटलं, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं....तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हुँ मैं ते छोड आए हम वो गलीयां....आमचं धन्यवादही पुरेस नसेल इतकं सुंदर तुम्ही आमचं आयुष्य बनवलं...हॅपी बर्थडे गुलजार.

गुलजार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

तर रितेशनंही पोस्ट शेअर करत म्हटलं, तुमच्या शब्दांनी आयुष्य आणखीच सुंदर बनवलं. विकी कौशलनंही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून गुलजार यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. मिलता तो बहोत कुछ है जिंदगी में..बस हम गिन्ती उसी की करते हैं...जो हासिल ना हो सका....या गुलजार यांच्या ओळी शेअर करत त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details