मुंबई - 3 ऑक्टोबर रोजी गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर ड्रग छापा टाकून नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खान आणि इतर सात जणांना अटक केली होती. त्यानंतर आर्यनला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. आर्यन खान याची मुंबई फोर्ट कोर्टाने क्रूज ड्रग्स प्रकरणात दाखल केलेली जामीन याचिका शुक्रवारी फेटाळली. आर्यन खानला आता आर्थर रोड जेलमध्ये राहावे लागेल. अशा परिस्थितीत आता आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करणार आहेत.
जामीन नाकारल्यानंतर भावूक झाली होती पूजा
दरम्यान, आर्यनचे आई -वडील शाहरुख खान आणि गौरी खान यांनी अद्याप कोणतीही सार्वजनिक ठिकाणावर हजेरी लावली नाही किंवा कोठडीत त्याला भेटायलाही गेलेले नाहीत. त्यांच्याऐवजी, पूजा ददलानी या आर्यन आणि खान कुटुंबातील मध्यस्थ म्हणून काम करीत आहे. 8 ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन सुनावणीदरम्यान पूजा न्यायालयात हजर होती. कोर्टाने जामीन फेटाळला तेव्हा ती भावूकही झाली होती. आता अनेकांना प्रश्न पडला आहे की ती कोण आहे?
मन्नतचीही व्यवस्था पाहते पूजा