महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

KBC Season 11: बिहारचा सनोज राज ठरला पहिला करोडपती, जाणून घ्या त्याच्याबद्दल - दोंगरा

जहानाबाद जिल्ह्यातील दोंगरा गावात राहाणाऱ्या सनोजला आयएएस(IAS) बनण्याची इच्छा आहे. मात्र, आयएएस बनून आपला प्रवास त्याला इथेच थांबवायचा नाहीये. तर समाजासाठी काहीतरी करण्याची त्याची जिद्द असल्याचे सनोजच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

सनोज राज ठरला पहिला करोडपती

By

Published : Sep 12, 2019, 9:26 AM IST

मुंबई- प्रसिद्ध टीव्ही शो कौन बनेगा करोडपतीमध्ये बिहारच्या एका तरुणानं या सीझनचा पहिला करोडपती बनण्याचा मान पटकवला आहे. सनोज राज असं नाव असलेला हा तरुण बिहारच्या जहानाबाद येथील आहे. सोनी वाहिनीनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे.

जहानाबाद जिल्ह्यातील दोंगरा गावात राहाणाऱ्या सनोजला आयएएस(IAS) बनण्याची इच्छा आहे. मात्र, आयएएस बनून आपला प्रवास त्याला इथेच थांबवायचा नाहीये. तर समाजासाठी काहीतरी करण्याची त्याची जिद्द असल्याचे सनोजच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. यासोबतच आपल्या मुलाचा प्रचंड अभिमान वाटत असल्याचंही ते म्हणाले.

एक कोटीच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिल्यानंतर सरोजसमोर ७ कोटींचा प्रश्न येतो. या प्रश्नाचं उत्तर तो बरोबर देणार की खेळ इथेच थांबवणार, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. गुरुवार आणि शुक्रवारच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना ते पाहायला मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details