महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जेव्हा अनपेक्षिपणे भेटतात आमिर आणि चिरंजीवी, पाहा आमिरची खास पोस्ट - movie

आमिरचा आवडता अभिनेता म्हणजेच चिरंजीवी अचानक क्योटो एअरपोर्टवर आमिरसमोर आला. यानंतर आमिरला झालेला आनंद त्याची पोस्ट वाचून तुम्हाला नक्कीच समजेल.

जेव्हा अनपेक्षिपणे भेटतात आमिर आणि चिरंजीवी

By

Published : Apr 8, 2019, 9:31 AM IST

मुंबई- आपल्या आवडत्या अभिनेत्याला भेटण्याची इच्छा तर प्रत्येकालाच असते. यात काही नाविन्य नाही. मात्र, तुमचा आवडता अभिनेता जेव्हा अचानकच एकदम अनपेक्षितपणे तुमच्या समोर येऊन उभा राहिला तर..? असंच काहीसं झालं बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टसोबत.


आमिरचा आवडता अभिनेता म्हणजेच चिरंजीवी अचानक क्योटो एअरपोर्टवर आमिरसमोर आला. यानंतर आमिरला झालेला आनंद त्याची पोस्ट वाचून तुम्हाला नक्कीच समजेल. हे खूप मोठं सरप्राईज असल्याचं म्हणत आमिरने चिरंजीवींसोबतचा आपला फोटो शेअर केला आहे.


या फोटोशिवाय आपण चिरंजीवींसोबत त्यांच्या आगामी चित्रपटाविषयी चर्चा केल्याचं त्याने म्हटलं आहे. हा चित्रपट स्वातंत्र्य सैनिक उय्यालवाडा नरसिम्हा रेड्डी यांच्यावर आधारित असणार आहे. चिरंजीवी नेहमीच आपलं प्रेरणास्थान असल्याचं सांगत आमिरने त्यांचं कौतुक केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details