मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने टीक टॉकच्या जमान्यात आपला टाक टूक व्हिडिओ बनवला आहे. जो पाहून तुम्हालाही हसू अवरणार नाही. 'काही टाक-टूक टाईमपास' असं कॅप्शन देत विद्याने आपल्या इन्स्टाग्रामवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
VIDEO: विद्या बालनचा 'टाक-टूक' व्हिडिओ पाहून नाही आवरणार हसू - funny video
व्हिडिओमध्ये विद्याने लाल रंगाची साडी घातली असून पारंपरिक वेशभूषेतील विद्याने डोक्यावर पदर घेतला आहे. तिने लग्नाआधी आणि लग्नानंतर मुलीत होणारे बदल अगदी विनोदी पद्धतीने सांगितले आहेत.
व्हिडिओमध्ये तिने लाल रंगाची साडी घातली असून पारंपारिक वेशभूषेतील विद्याने डोक्यावर पदर घेतला आहे. तिने लग्नाआधी आणि लग्नानंतर मुलीत होणारे बदल अगदी विनोदी पद्धतीने सांगितले आहेत. शास्त्रानुसार प्रत्येक मुलीत लग्नाआधी ९ देवींचा निवास असतो. मात्र, लग्नानंतर तिच्यातील कोणती देवी प्रकट होईल, हे नवऱ्याच्या कर्मावर अवलंबून आहे, अशा आशयाचा हा व्हिडिओ आहे.
विद्याच्या या विनोदी व्हिडिओला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. अवघ्या दोन तासात या व्हिडिओला १.३५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास विद्या लवकरच 'मिशन मंगल' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.