लंडनमध्ये वर्षभर राहिल्यानंतर सोनम कपूर भारतात परतली आहे. एअरपोर्टवर तिला घ्यायला आलेल्या वडिलांनी अनिल कपूरला पाहून अभिनेत्री अस्वस्थ झाली. बऱयाच दिवसानंतर भेटल्याने वडिलांच्या बाहुपाशात ती भावूक होऊन रडताना दिसली.
मुंबई - लंडनमध्ये काही महिने घालवल्यानंतर अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा मुंबईत परतली आहे. सोनम मंगळवारी रात्री मुंबईत आली. तिचे मुंबई विमानतळावर आगमन झाल्यानंतरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अनिल कपूूरना पाहताच विमानतळावर रडली सोनम कपूर सोनमचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेता अनिल कपूर विमानतळावर तिच्या स्वागतासाठी आले होते. बऱ्याच दिवसानंतर वडिलांना पाहिल्यानंतर ती भावूक झालेली दिसली. जोरदार मिठी मारताना तिच्या डोळ्यात अश्रू तरळले.
मुंबईत येण्यापूर्वी सोनमने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर 'मी घरी येत आहे', अशी पोस्ट लिहिली होती. सोबत तिने विमानात बसल्याचा फोटोही शेअर केला होता. दरम्यान, सोनमचा पती आनंद आहूजा याने पत्नीला मिस करीत असल्याचे म्हटले आहे.
वर्क फ्रंटवर बोलायचे तर सोनम कपूर आगामी 'ब्लाइंड' या चित्रपटात दिसणार आहे. या भूमिकेसाठी, तिने अंध व्यक्तींची बॉडी लँग्वेज शिकली आहे. हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट एका अंध पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरत आहे जो एका सीरियल किलरच्या शोधात आहे. या चित्रपटात विनय पाठक, पूरब कोहली आणि लिलेट दुबेही आहेत. ब्लाइंड हा चित्रपट 2011 मध्ये रिलीज झालेल्या त्याच नावाच्या दक्षिण-कोरियन चित्रपटावर आधारित आहे.
हेही वाचा - बॉलिवूड 'क्वीन'ची OTT एन्ट्री : टेंम्प्टेशन आयलँडच्या शोची होस्ट बनणार कंगना रणौत