मुंबई (महाराष्ट्र) - शाहीद कपूरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला अभिनेत्री अनन्या पांडेच्या आणि ईशान खट्टरच्या उपस्थितीने त्यांच्या गाजलेल्या रोमान्सला हवा मिळाली आहे. अनन्या-ईशान शिवाय शाहिदच्या वाढदिवसाची पार्टी त्याच्या कबीर सिंग चित्रपटाची सह-कलाकार कियारा अडवाणी आणि तिचा कथित प्रियकर सिद्धार्थ मल्होत्रा यांनी देखील हजेरी लावली होती.
शाहिदने शुक्रवारी आपला ४१ वा वाढदिवस साजरा केला. या पार्टीतील सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल झाली आहेत. यावेळी फोटोग्राफर्सने बर्थडे बॉयसह त्याची पत्नी मीरा आणि मुले, मीशा आणि झैन, त्याचा धाकटा भाऊ आणि अभिनेता इशान यांचे फोटो क्लिक केले आहेत.
मीराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये देखील अनन्या पांडेसोबतचा फोटो शेअर केला आहे. यामुळे ती गेट-टूगेदर पार्टीमध्ये उपस्थित असल्याची खात्री होते. फोटोत मीराला सनग्लासेससह फुलांचा टॉप घातलेला दिसत आहे. तर अनन्याने पांढऱ्या-हिरव्या फुलांचा स्ट्रॅपी ड्रेस परिधान केला होता.