मुंबई- बॉलिवूडचे दोन अॅक्शन कलाकार हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यांचा आगामी वॉर सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. हा सिनेमा अॅक्शनव्यतिरिक्त चित्रपटातील जबरदस्त आणि लक्षवेधक लोकेशनमुळेही चर्चेत आहे.
हृतिक-टायगरचा 'वॉर' सात देशांमध्ये झालाय चित्रीत - seven countries
सिद्धार्थ आनंद यांचं दिग्दर्शन असणारा हा सिनेमा तब्बल ७ देशांमध्ये चित्रीत केला गेला आहे. तर जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील १५ शहरांत याच चित्रीकरण केलं गेलं आहे.
सिद्धार्थ आनंद यांचं दिग्दर्शन असणारा हा सिनेमा तब्बल ७ देशांमध्ये चित्रीत केला गेला आहे. तर जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील १५ शहरांत याच चित्रीकरण केलं गेलं आहे. पोर्तुगालमधील पोर्टो शहरात या चित्रपटाचं चित्रीकरण करताना आम्हाला येथील मुख्य पुल दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याची परवानगी घ्यावी लागली होती, असं दिग्दर्शन सिद्धार्थ यांनी म्हटलं.
यामुळे तेथील नागरिक कुतूहलानं पाहायला आले होते, की नेमकं कोणत्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. कारण याआधी कोणत्याही चित्रपटासाठी हा पुल बंद असलेला त्यांनी पाहिलं नव्हतं. हृतिक आणि टायगरचे अॅक्शन सीन पाहून त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे होते, असं सिद्धार्थ म्हणाले.