मुंबई - 'मेक इन इंडिया' या संकल्पनेवर आधारित 'वाह जिंदगी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. सिनेजगतातील आघाडीचे संगीतकार ए. आर. रेहमान यांचे संगीत या चित्रपटाला मिळाले आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन पराग छाबरा हे करत आहेत.
जिंदगी एक खेल है, खेलना जरुरी है; 'वाह जिंदगी'चा टीजर प्रदर्शित!
'मेक इन इंडिया' या संकल्पनेवर आधारित 'वाह जिंदगी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. सिनेजगतातील आघाडीचे संगीतकार ए. आर. रेहमान यांचे संगीत या चित्रपटाला मिळाले आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन पराग छाबरा हे करत आहेत.
पराग छाबरा यांनी यापूर्वीही ए. आर. रेहमान यांच्यासोबत 'सचिन - द बिलियन ड्र्रिम्स', 'मॉम' आणि 'मोहेनजोंदारो', या चित्रपटात काम केले आहे.
'मेक लोकली-एक्सपोर्ट ग्लोबली' म्हणजे, 'स्थानिक स्तरावर तयार करा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करा', या संकल्पनेवर या चित्रपटाची कथा आधारित आहे. या चित्रपटाद्वारे, भारतीय उत्पादनांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच तरुणांना उद्योग जगतात समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हा चित्रपट भारतीय उद्योगांना नवी ओळख निर्माण करून देईल. त्याचबरोबर आर्थिक विकासातही काही प्रमाणात मदत होईल, असे 'वाह जिंदगी'चे पटकथालेखक अशोक चौधरी यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या संगीत सोहळ्याचे अनावरण करण्यात आले होते. ए. आर. रेहमान यांच्या ट्विटर अकाऊंटवर याचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. 'वाह जिंदगी' या चित्रपटात नवे चेहरे झळकणार आहेत. संजय मिश्रा, विजय राज, प्लबिता बोरठाकूर, नविन कस्तुरीया आणि मनोज जोशी हे कलाकार झळकणार आहेत. 'मेक इन इंडिया' या कल्पनेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश यादव हे करत आहेत.