महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

विकी-कॅटरिनाच्या विवाहस्थळावर स्वयंसेवक तैनात, राजवाडा स्टाईलची भव्य सजावट - Vicky-Katrina's Bullet Proof Marriage

विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नासाठी (Vicky And Katrina Kaif Wedding) हॉटेल सिक्स सेन्सच्या आत आणि बाहेर सजावटीचे काम सुरू झाले आहे. हॉटेलच्या आत भव्य मंडप बांधला जात आहे. आज म्हणजेच ४ डिसेंबर रोजी लग्नाचे लोकेशन ताब्यात घेण्यात आले. तेथील सर्व कर्मचाऱ्यांनाही बाहेर पाठवण्यात आले आहे.

विकी कौशल आणि कॅटरिना कैफ
विकी कौशल आणि कॅटरिना कैफ

By

Published : Dec 4, 2021, 8:47 PM IST

हैदराबाद - कॅटरिना कैफ आणि विकी कौशल 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नाला 120 पाहुणे हजेरी लावणार असून त्यात अनेक बॉलिवूड स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या लग्नाचे ठिकाण सवाई माधोपूरच्या चौथ का बरवाडा येथे हॉटेल सिक्स सेन्स फोर्ट आहे, परंतु लग्नाचे ठिकाण शनिवारी म्हणजेच ४ डिसेंबरला कार्यक्रमापूर्वी ताब्यात घेण्यात आले. तेथील सर्व कर्मचाऱ्यांनाही बाहेर पाठवण्यात आले आहे.

कॅटरिना आणि विकी कौशल यांचे लग्न बुलेट प्रूफ स्टाईलमध्ये होणार आहे. तेथे पाहुण्यांना फोन वापरायला परवानगी नाही आणि ड्रोनवरही रेकॉर्डिंग करता येणार नाही. इथे दाखल होणाऱ्या पाहुण्यांचेही पूर्ण लसीकरण केले जाईल, त्याशिवाय त्यांना प्रवेशही मिळणार नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईतील व्यवस्थापन पथक शनिवारी घटनास्थळी पोहोचले. तेथील सर्व कर्मचाऱ्यांना हॉटेलबाहेर काढण्यात आले. लग्न होईपर्यंत हे कर्मचारी येथे काम करणार नसल्याचे सांगितले जात आहे. आता तिथे कोण काम करणार, असा प्रश्न निर्माण तुमच्या मनात आला असेल. तर, व्यवस्थापन टीमने हॉटेलमध्ये आपले स्वयंसेवक तैनात केले आहेत.

ते स्वयंसेवकच आता 10 डिसेंबरपर्यंत काम करतील. इव्हेन्ट मॅनेजमेंटच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रम संपेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला हॉटेलमध्ये प्रवेश मिलणार नाही. लग्नात येणाऱ्या 120 पाहुण्यांनाच हॉटेलमध्ये प्रवेश दिला जाईल. लग्नातील व्हिडिओ आणि फोटोसाठी आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार मारिया टेस्टिनोला नेमण्यात आले आहे. सवाई माधोपूरचे पोलीस प्रशासनही सतर्क आहे. सुरक्षा आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस दलही सक्रिय आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नासंदर्भात हॉटेल सिक्स सेन्सच्या आत आणि बाहेर सजावटीचे कामही सुरू झाले आहे. हॉटेलच्या आत भव्य मंडप बांधला जात आहे. संपूर्ण मंडप राजवाडा स्टाईलमध्ये तयार करण्यात आला असून त्याला आलिशान लूक देण्यात आला आहे. या राजवाडा स्टाईल मंडपात कॅटरिना कैफ आणि विकी कौशल सात फेरे घेणार आहेत.

7 डिसेंबरला मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे आणि 8 डिसेंबरला संगीताचा कार्यक्रम होणार आहे. ९ डिसेंबरला कॅटरिना कैफ आणि विकी कौशल लग्नबंधनात अडकणार आहेत. कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची तारीख जवळ आल्याने आता हॉटेलचा संपूर्ण ताबा मुंबईतील व्यवस्थापन समितीने घेतला आहे.

हेही वाचा - मालिदवच्या रस्त्यवर सायकल चालवताना दिसली मलायका अरोरा

ABOUT THE AUTHOR

...view details