नवी दिल्ली- सध्या सुरू असलेल्या भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेच्या प्रसारणाच्या वेळी रविवारी सेलिब्रिटी जोडपे अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची एक वर्षाची मुलगी वामिकाचा चेहरा झळकला आहे. यामुळे विरुष्काचे चाहते सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची एक वर्षाची मुलगी वामिकाचा चेहरा प्रसार माध्यमांपासून दूर ठेवण्यात विरुष्काला आजयवर यश मिळालं आहे. मात्र भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेच्या क्रिकेट स्पर्धेदरम्यान वामिकाचा चेहरा खेळाच्या प्रसारणात झळकला. अनुष्का आणि वामिका मैदानात खेळणाऱ्या विराटला प्रोत्साहन देत असताना दोघींना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. या फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.
यामुळे या जोडप्याचे चाहते संतप्त झाले आहेत कारण विराट आणि अनुष्काने तिच्या जन्मापासून वामिकाचा चेहरा उघड केला नव्हता. आपल्या मुलीचा चेहरा गोपनीय ठेवण्यासाठी या स्टार जोडप्याने हौशी फोटोग्राफर्सना क्लिक न करण्याची विनंती केली आहे.
असे सर्व असताना एका ब्रॉडकास्टरने स्टेडियममधील व्हीआयपी लाउंजमधून विराटचा जयजयकार करतानाचा अनुष्का आणि वामिकाचा व्हिडिओ प्रसारित केला.
स्टार जोडप्याच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असलेल्या नेटिझन्सनी या व्हिडिओचे स्क्रीनशॉट घेतले आणि सोशल मीडियावर फोटो प्रसारित केले.
"ज्युनियर कोहली," "ती तिच्या वडिलांची कार्बन कॉपी आहे," "ओमजी, सो क्युटी," अशा प्रचंड कॉमेंट्स सोशल मीडियावर सतत येत आहेत. इतकेच नाही तर भरपूर मीम्सही सोशल मीडियावर फिरत आहेत.