महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अनुष्कासारखीच दयाळू आणि भक्कम स्त्री वामिका बनावी, 'ही विराटची इच्छा'!! - अनुष्मा, विराटची मुलगी

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त क्रिकेटपटू विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिकासोबतचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. त्याने लेक आणि पत्नीसह सर्व महिलांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Virat wants daughter Vamika
अनुष्मा, विराटची मुलगी वामिका

By

Published : Mar 8, 2021, 4:20 PM IST

मुंबई- आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने भारताचा कर्णधार विराट कोहलीने सोमवारी आपली पत्नी अनुष्का शर्मा आणि त्यांच्या नवजात मुलीला मनापासून पोस्ट समर्पित केली आहे.

क्रिकेटपटू विराटने आपल्या इन्स्टाग्रामवर अनुष्का आणि त्याची मुलगी वामिका यांचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आणि त्याच्यासाठी एक सुंदर संदेश लिहिला आहे. त्याने लिहिलंय, "हा एक धक्कादायक, अविश्वसनीय आणि जबरदस्त अनुभव होता. हे पाहिल्यानंतर, आपल्याला महिलेची वास्तविक शक्ती आणि देवत्व समजते आणि मग समजते की देवाने त्यांच्यामध्ये जीवन का निर्माण केले. कारण त्या पुरुषांपेक्षा बऱ्याच शक्तिशाली आहेत. "

आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करणाऱ्या विराटने पुढे लिहिलंय, "माझ्या आयुष्यातील सर्वात दयाळू आणि भक्कम स्त्री आणि आपल्या आईसारखीच मोठी होऊन बनणारी (मुलगी) यांना व सर्वांनाच महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा."

फोटोमध्ये अनुष्का तिच्या चेहऱ्यावरील हास्यासह बाळासोबत दिसत आहे. यात वामिकाचा चेहरा फ्रेममध्ये दडलेला आहे. परंतु तरीही हे एक गोंडस आणि हृदयस्पर्शी दृश्य आहे.

११ जानेवारीला अनुष्का आणि विराटने आपल्या मुलीचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात स्वागत केले होते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या जोडप्याने जाहीर केले होते की जानेवारी २०२१ मध्ये त्यांना आपल्या पहिल्या अपत्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, कामाच्या पातळीवर अनुष्का, २०१८ मध्ये 'झिरो' या शेवटच्या चित्रपटात सह-अभिनीत अभिनेता शाहरुख खान आणि कॅटरिना कैफसोबत या सिनेमात दिसली होती. त्यांनी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या पाताळ लोक या वेब सिरीजची आणि नेटफिल्मक्सवरील बुलबुल या चित्रपटांची निर्मिती तिने केली होती.

हेही वाचा - सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोणने मिळवला 'हा' सन्मान

ABOUT THE AUTHOR

...view details